तूच सीता, कधी चंडिका
कधी राधा, तर कधी दुर्गा
तूच आहेस शक्ती आणि
तूच आहेस अंबा
सृजनशीलतेची आणि कर्तव्याची मूर्ती तू
अखंड इतरांसाठी जगणारी तू
मुलांच्या स्वप्नांना पंख देणारी तू
सदैव अविरत झटणारी तू
घे उंच भरारी
त्या निळ्या आकाशात तू ही कधीतरी
पसरून पहा पंख
जग तू ही कधीतरी स्वतःसाठी
शोध घे स्वतःचाच तू
ठाव घे त्या मनाचा
शोध घे अस्तित्वाचा
तुझ्यातल्या मी पणाचा
Nice beginning. Keep it up ..... baba
ReplyDelete