संथ श्वसन
श्वासाची गती संथ
नॉर्मल ब्रीदिंग
हे शब्द कानावर पडले कि एकदम शांत वाटतं, प्रसन्न वाटतं.
रोज सकाळी प्राणायामाच्या ऑनलाईन वर्गात हे शब्द हमखास ऐकू येतात.
पुण्यात राहणाऱ्या सपना मॅडम योग शिकवतात, त्यांच्याकडे बरेचजण योगा शिकतात. एकदम प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे त्यांचे. कायम शांत आणि संयोजित असतात. त्यांचा आवाज हि खूप गोड़ आहे. मी जर्मनी वरून गुगल मीट वर वर्ग जॉईन करते!