10 February 2023

Blog Marathon - February 2023 - Day 10 - प्राणायाम

संथ श्वसन

श्वासाची गती संथ

नॉर्मल ब्रीदिंग

हे शब्द कानावर पडले कि एकदम शांत वाटतं, प्रसन्न वाटतं.

रोज सकाळी प्राणायामाच्या  ऑनलाईन वर्गात हे शब्द हमखास ऐकू येतात.

पुण्यात राहणाऱ्या सपना मॅडम योग शिकवतात, त्यांच्याकडे बरेचजण योगा शिकतात. एकदम प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे त्यांचे. कायम शांत आणि संयोजित असतात. त्यांचा आवाज हि खूप गोड़ आहे. मी जर्मनी वरून गुगल मीट वर वर्ग जॉईन करते!

अर्ध्या तासात आम्ही  विविध प्राणायाम करतो. साधारण दोन महिन्यांपूर्वी स्नेह फोरम जर्मनी ह्या फेसबुक ग्रुप वर ओळख झालेल्या अनु देशपांडे ने मला ह्या वर्गांबद्दल सांगितले. तिनेच मला सपना मॅडम चा नंबर दिला आणि मी लगेच संपर्क साधला. त्यांनी मला पुढच्या दिवशी ट्रायल क्लास ला यायला सांगितले. तो अर्धा तास कसा संपला, कळलेच नाही. त्या अत्यंत शांतपणे सगळ्यांना समजेल असे सूचना देत होत्या आणि मला जमेल तसे मी करत होते. मला तो अनुभव फारच आवडला आणि मी लगेच शुल्क भरून रोज वर्गात हजेरी लावायला सुरवात केली. 

नवीन असताना, त्यांनी सगळे नीट समजावून सांगितले, कसे करायचे, काय करायचे त्याचबरोबर ते केल्याने काय फायदे होणार आहेत हे सांगितले. प्राणायाम करताना हाताच्या वेगवेगळ्या मुद्रा करायच्या असतात. प्रत्येक मुद्रेचे वेगवेगळे फायदे आहेत, ते देखील मॅडम आम्हाला वेळोवेळी सांगत असतात. ज्ञान मुद्रा, चीन मुद्रा, प्राण मुद्रा,आदी मुद्रा, चिन्मय मुद्रा, भ्रम्ह मुद्रा ह्या आम्ही वेळोवेळी करतो.

सर्व प्रथम गुरुब्रह्म गुरुविष्णू हि प्रार्थना म्हणून, आम्ही वर्गाला सुरवात करतो. मग

अनुलोम विलोम

सूर्य भेदन

कपालभाती

भ्रामरी 

ओंकार (अ उ म चा उच्चार)


 

दीर्घ श्वसन 

उज्जयी प्राणायाम आम्ही आलटून पालटून करतो.

शेवटी सर्व मंगल मांगल्ये हि प्रार्थना आणि तीन वेळेला ओंकार म्हणून वर्गाची सांगता करतो.

ओंकार म्हणायला लागल्यापासून माझ्या झोपेत चांगलीच सुधारणा झाली आहे. It is like a magical pill!

प्राणायामाचे खूप फायदे आहेत:

१. तणाव कमी होतो, मन शांत होते 

२. चांगली झोप लागते व सुधारते 

३. सजगता वाढवते

४. उच्च रक्तदाब कमी करते

५. फुफ्फुसाचे कार्य सुधारते

६. संज्ञानात्मक कार्यक्षमता वाढवते

प्राणायामाचे ध्येय म्हणजे आपल्या शरीर आणि मन यांच्यातील संबंध मजबूत करणे.

मला तर वाटतं प्रत्येकाने थोडा वेळ काढून प्राणायाम नक्कीच करावा. आपल्याकडे असलेल्या ह्या शास्त्राचा नक्कीच सर्वांनी उपयोग करावा. लहान, मोठे, सगळ्यांनाच ह्याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे आपला एक सशक्त आणि बलवान समाज निर्माण होणार आहे.

आपल्याला सपना मॅडम ची संपर्क करायचा असल्यास. त्यांचा नंबर इथे नमूद करत आहे. 

Dr Sapna's Yoga and Ayurved Centre

Contact no. - +91 9922258590

Her Facebook page:



No comments:

Post a Comment

Lost and found

Today, it was especially warm compared to other days in the otherwise dull and gray month of November. The sun was shining and was hinting a...