05 June 2011

Mumbaicha paaus

मुंबई मध्ये मी कालच आले.

मुंबई मध्ये अगदीच नाही म्हणता येणार नाही, डोंबिवली ह्या शहरात माझे आई बाबा राहतात, मुंबई हून एक तास ट्रेन ने लागतो, पण डोंबिवली च्या ऐवजी मी मुंबईचीच असा खपवते मी..

डोंबिवली मध्ये पाय ठेवल्या पासून इकडे पावसाने धूम केली आहे. तसा मुंबईचा पाउस मला नवीन नाही. मी वयाची २५ वर्ष इकडेच होते, पण गेली ६ वर्ष बंगलोर ला असल्यामुळे आता तिकडच्या गोष्टींची सवय (वाईट सवय) झाली आहे. छान हवामान, कमी पाउस आणि ८ महिने थंडी अशी सवय झाल्यामुळे मुंबई खूपच वेगळी वाटते.

काल आल्यापासून  मी एकही मिनिट पंख्या खालून हलले नाहीये..


बाहेर किती ही धो धो पाउस पडत असो, त्या सोबत घामाच्या धारा ह्या ओघाने येतातच. तापमान कायमच उष्ण कितीही काहीही झाला तरीही. इकडे सुती कपडे घालणे शक्य आहे. कितींदा ही अंघोळ केली की उबल्यासारखा होतं. जीव कासावीस होतो आणि कधी एकदा पंख्याच्या खाली बसत्ये असा होतं मला. माझे आई, बाबा जेव्हा माझ्याकडे बंगलोर ला येतात तेव्हा त्यांना किती ही थंडी असली की पंखा हा लागतोच. मी तेव्हा त्यांची चेष्टा करायचे की हे त्यांचं उकडण 'मानसिक" आहे, पण इकडे आल्यापासून मला जाणवतंय की पंखा हा मुंबईचा अविभाज्य घटक आहे आणि मुंबईकर आणि पंखे हे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत.


मुंबई मध्ये पाउस म्हणजे चिखल, किचाट, त्यात भरपूर गर्दीची भर, छत्र्यांची जत्रा, गाड्यांचा गोंधळ, पण पिण्याच्या पाण्याची टंचाई अश्या अनेक प्रश्नांना तोंड देऊन ही मुंबई कित्येक वर्ष अशीच धडाडीने अविरत चालू आहे. लोकांचे लोंढे येत असतात, मुंबई त्या सगळ्या लोकांना सामावून घेते आणि कायम हसत खेळत असते. किती ही घाव मिळाले तरी कधी ही थकत नाही, किती ही हल्ले झाले मुंबई वर तरीही अवसान न गाळता धिटाई ने पुढे चालतच राहते. मुंबईचं हे रूप तिच्यात वसलेल्या लोकांमुळेच आहे नाही का?

I salute the never say die attitude of Mumbai!

ये ही मुंबई मेरी जान...

:-)

No comments:

Post a Comment

The dilemma

My mother-in-law left for Pune today after spending two and a half months with us in Germany. And suddenly the house seems empty without her...