01 May 2011

Atul mahatmya

स्नेहल आणि मी एकाच प्रोजेक्ट मध्ये काम करत होतो, पण वेगवेगळ्या ठिकाणी बसून.

मी बंगलोर ला  होते  आणि  ती  हैदराबाद  ला. पण  ती  आणि  मी,  डोंबिवली  ह्या  मुंबई  च्या  जवळ  असलेल्या  एका  छोट्या  शहरातून  असल्यामुळे, आमची पटकन मैत्री झाली आणि आम्ही भरपूर बोलायला लागलो, कामाबद्दल आणि कामा व्यतरिक्त सुद्धा!

माझ्या नवऱ्याचं नाव अतुल, माझा प्रेम विवाह झालेला, नुकतच लग्न झाल्यामुळे, अतुल नावाच्या कोड्याला ओळखायला खूप वेळ लागला मला. प्रेम करणं वेगळं आणि त्या प्रेमाबरोबर २४ तास राहणं वेगळं. मी रोज काही न काहीतरी कुरबुर करायचे स्नेहलकडे आणि ती अगदी तल्लीन होऊन ऐकायची आणि मला समजवायचा प्रयत्न करायची.  मी जेव्हा कधी तिच्याकडे तिच्या लग्नाचा विषय काढायचे, ती टाळायची आणि नंतर एक दिवस तिने एक गौप्यास्पोट केला !!

स्नेहल: लिनी, मला तुला काहीतरी सांगायचा आहे.

मी: हो बोल की.

स्नेहल:  अगं तू जेव्हा जेव्हा अतुलचं नाव घ्यायचीस तेव्हा तेव्हा तुला मला सांगावसं वाटत होते, पण राहून जायचं. माझ्या होणारया नवऱ्याचं नाव सुद्धा अतुल आहे गं, आम्ही कॉलेज पासून ओळखतो एकमेकांना आणि तू तुझ्या अतुल बद्दल जे जे काही सांगतेस अगदी ते ते माझ्या अतुल बद्दल ही खर असतं गं! असं कसं शक्य आहे?

मी (एकदम उल्हासित होऊन): We are sailing in the same boat! समदुख्खी आहोत गं मग आपण!
स्नेहल (जोरात खी खी करून हसली) : हो गं लिनी, खरं आहे तुझ. मला तर हे दोघे  “बिछाडे हुये जुडवा भाई” वाटतात.

ह्या संवादामुळे आम्ही अधिकच जवळ आलो. आणि अश्या बऱ्याच संवादानंतर आम्ही आमच्या अतुल ची एक  "Similarity  List" काढली आणि आमचंच आम्हाला हसू आलं.काही  “strikingly similar” गोष्टी:

1)  दोघांनाही माणसांशी बोलायला प्रचंड कंटाळा येतो.

2)  कॉम्पुटर, TV ह्या निर्जीव वस्तू जास्ती जवळच्या वाटतात.

3)   देवावर, पत्रिकेवर अजिबात विश्वास नाही. स्वतःवरच काय तो विश्वास.

4)   झोपे पेक्षा दुसरी कुठलीही गोष्ठ त्यांना ह्या पृथ्वीवर प्रिय नाही.

5)   झोपे नंतरची दुसरी प्रिय गोष्ट म्हणजे खाणे. मग काहीही आणि रुचकर चालतं. मासाहारी तर धावतं! खाण्यासाठी जगायचे कसे हे ह्या दोघांकडून शिकण्यासारखे आहे!

6)  बाथरूम मध्ये गेले की हे  बाकीचं सगळं विसरतात आणि मग त्यांना आठवण करून द्यावी लागते की बाथरूमच्या बाहेर ही एक छानस जग आहे.

7)  क्रिकेट अतिशय आवडतं, मग एक चेंडू ही मिस झालेला चालत  नाही आणि आपण जणू फिल्ड वरच आहोत अस त्यांना वाटतं. जोरजोरात कमेंट्स चालू  असतात, जसं काही ह्यांचा ऐकून अम्पायर तिकडे निर्णय बदलणार आहे.

8)  प्रत्येक गोष्ट नीट नेटकी पाहिजे, सारखे हात धुवायचे, पाणी प्यायच भांडं नीट बघून घ्यायच किंवा त्याला थोडासा जरी डाग असेल तर ते खराब आहे असं जाहीर करून टाकायचं. मोलकरणी कसं नीट काम करतच नाहीत आणि सगळं ह्यांनाच कसं कराव लागता हा अविर्भाव.

9)  कामालाच देव मानतात आणि स्वतःला स्वतःचाच प्रतिस्पर्धी करतात. नम्रपणे बोलून, हसत हसत कधी विकेट घेतात ते समोरच्याला कळत ही नाही!

10) आई, वडिलांवर भरपूर प्रेम करतात, आदर करतात, पण छे हे सगळं बोलून कुठे दाखवायचा असतं? ते तर आई, बाबांनीच समजून घ्यायचा असतं.

11)  स्वतःची गाडी आणि laptop  जिवापलीकडे जपतात. म्हणून मग गाडी आणि laptop कोणाच्या ही हातात द्यायचे नाही. “Single hand use and driving” का असच तत्सम काहीतरी अगदी नित्यनियमे अमलात आणतात.

12)  भेटवस्तू देण हे मुळात सुचतच नाही, घरी मुलगी (बहीण) नसल्यामुळे मुलींना काय काय आवडतं हे माहीतच नाही. बर सांगून, hints देऊनही ते समजेलच ह्याची काही guarantee नाही. पण आता हल्ली बरीच सुधारणा झाली आहे असंच म्हणावं लागेल.

13)  बायको जे काही बोलते किंवा जे काही उपदेश करते, ते तिचा वेळ जात नाही म्हणून बडबडत असते. त्याच्याकडे नेहमीच लक्ष द्यायचं असतंच असं नाही. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणे हे बरोबर जमते आणि मग नंतर तू मला हे सांगितलंच नाहीस हे म्हणायलाही मागे पुढे बघत नाहीत.

१४) कपडे खरेदी अतिशय आवडते पण बायको साठी करायची असेल तेव्हा लवकरच उरकवतात. काहीही विचारलं त्यांना की ते छानच असतं. स्वतःसाठी मात्रा एक पॅंट आणि एक शर्ट घ्यायला ३ तास सुद्धा कमीच पडतात त्यांना.

एकाच नावच्या व्यक्ती इतक्या सारख्या असू शकतात??

मी आणि स्नेहल ह्या दोघांवर बोलायला लागलो ना की “ए हो हो, बरोबर, अगदी असच करतो किंवा असच नाही करत” हीच वाक्यं असतात आमची.

पण वर नमूद केल्यप्रमणे जरी असले तरी मानाने अतिशय चांगले आहेत दोघं आणि ह्यांच्या सारखा बेस्ट आम्हाला दुसरा कोणी मिळूच शकलं नसतं.

What say Snehal?

3 comments:

  1. Shreyas S Joshi2 May 2011 at 17:30

    this was the best write up till now
    may be subject mule mala jasta avadla asel
    pan majaa ali vachtana

    ReplyDelete
  2. Koustubh Foujdar2 May 2011 at 17:31

    I could not help but smile after reading this article :-)

    The things you have mentioned hold good for most of the typical Indian men. For e.g. most men love their car. For most men, the cricket match is more important than anything else.

    ANi tyatun hya don vyaktinche naav hi same ahe.

    ReplyDelete
  3. aga kay sangte..............add amit's name as well pt no. 14 sodun baki sagle "gun" tantotant julatat.............

    ReplyDelete

The dilemma

My mother-in-law left for Pune today after spending two and a half months with us in Germany. And suddenly the house seems empty without her...