Gandha

कालच स्टार प्रवाह वर "गंध" हा अप्रतिम चित्रपट बघायला मिळाला. सगळेच कलाकार ताकदीचे होते. ३ लघु कथांना गुंफून  एक मस्त असा वातावरण तयार केला होता. उत्तम दिग्दर्शन, उत्तम सादरीकरण आणि थोडक्यात बरच काही सांगायचा अगदी सुंदर प्रयत्न वाटला. 

"गंध" ह्या शब्दाचा इंग्रजी मध्ये "स्मेल" असा अनुवाद करण्यात आला होता ह्या चित्रपटात. मला तो खटकला. "गंध" सारख्या इतक्या सुंदर मराठी शब्दाचा अनुवाद इंग्रजी मध्ये "स्मेल" असा कसा होऊ शकतो? नाही अजिबात होऊ शकत नाही. गंध ह्या शब्दाचा जो अर्थ मला पटकन सुचला तो होता एकच "fragrance".

पहिला पाउस पडला की मातीला जो वास येतो तो गंध, हिरव्या ओल्या पानांना जो हिरवा वास येतो येतो तो ही गंधच. एखादं बाळ उराशी धरला की त्याच्या तोंडाला दुधाचा  जो चिकट गोड असा वास येतो तो गंध. कोऱ्या नवीन पुस्तकांचा गंध तसंच नवीन करकरीत नोटांचाही गंधच, कपड्यांवर अत्तराचा मंद असा दरवळणारा गंध आणि शेणानी अंगण सारवतात तेव्हा येणारा ही गंधच.

आजी जेव्हा फोडणीत छानपैकी कढीपत्ता आणि लसूण टाकते आणि तेव्हा जो काही घमघमाट सुटतो तो ही एक प्रकारचा गंधच, नाही का? बकुळीच्या फुलांचा ही गंधच आणि गाभार्यातून येणारा धुपाचा तो मंत्र मुग्ध करून टाकणारा वास तो ही एक गंधच हो ना?.

गंध आठवणी ताज्या करतो आणि आपल्याला त्या रम्य अश्या जगात थोडा वेळ का होईना पण घेऊन जातो. गंध धुंद करतो, मुग्ध करतो.

आणि शेवटी गंध हा आपल्या अस्तित्वाचाच एक भाग होऊन राहतो.

Comments

  1. apratim!!!! mi pan baghen ha cinema ata.....

    ReplyDelete
  2. ataparyantachya likhanamadhla best blog!!!

    ReplyDelete
  3. वा वा मृणालिनी,
    काय सुबक वर्णन केला तू, फारच छान
    १ -१ उदाहरण काय सुंदर, अतिशय मार्मिक
    मज्जा आला

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नादातुनी या नाद निर्मितो

Ganesh Utsav in Karlsruhe

A divine afternoon - Annual get-together of Adhyatmavari group