मी माझी

सॻळीच गणितं चुकली
सगळेच अंदाज फोल ठरले
इतरांना खुश ठेवायच्या नादात
स्वतःलाच हरवून बसले

मला नक्की काय हवं आहे मला कधीच कळलं नाही का?
इतरांच्यात सुखात मी माझं सुख शोधत राहिले का?
ह्या सगळ्यात मला नक्की काय मिळालं?
कोलमडून, एकटी पडले, अगदी जमीनदोस्त झाले

चुकां मधून माणूस शिकतो, त्याला शहाणपण येतं
माझ्या सारखी एखादीच
त्याच चुका पुन्हा पुन्हा करून
स्वतःलाच मूर्ख ठरवले

पण आता सावरले, माझेच मला उमगले
माझा आनंद माझ्याच हातात आहे
मला आता स्वतःसाठी जगायचं आहे
मला काय हवे आहे तेच करायचे आहे

एक दार बंद झालं की दुसरं दार उघडतं
काहीतरी हरवतं तर काहीतरी गव‌सतं
स्वतःच्या शोधात निघताना
एक वेगळंच बळ मिळून जातं





Comments

Popular posts from this blog

नादातुनी या नाद निर्मितो

Ganesh Utsav in Karlsruhe

A divine afternoon - Annual get-together of Adhyatmavari group