13 January 2012

Tujhyasaathi


चाहूल तुझी
लागता
मी मोहरून गेले
तुझा आगमन
लवकरच होणार
ह्याने मी अत्यंत
भारावून गेले..

तू कोणासारखा दिसशील?
असा हसशील की तशी रडशील?
तुझे केस कसे असतील?
टपोरे घारे डोळे
की बाबासारखे मधाळ?
पण मुख्य म्हणजे तू कसा ही असलास आणि दिसलास तरी
आमचा असशील!

छकुले /छकुल्या ..
तुझी वाट बघत
तुझी स्वप्न रंगवत
रोज तुझ्याशी बोलत
तुला गोष्ट  सांगण्यात
आता दिवस भुर्कन उडून जातील...

आणि मग
तुला हातात घेईन तेव्हा 
मला काय वाटेल
तू मला आई केलस
ह्या भावनेने तर मला रडूच येईल

मग सुरु होईल एक सुंदर प्रवास
तुला वाढवण्याचा आणि
तुझ्याबरोबर मला ही भरपूर काही शिकायचा




3 comments:

  1. Beautifully written dear :-) Too good !!!

    ReplyDelete
  2. Didn't get the meaning of most of the words but am sure it's a beautiful poem.

    In bet, the blog theme looks nice :-)

    ReplyDelete
  3. kay masta lihile ahe ga... pharach sundar ..

    Kaviyatri zalis ki ..

    Congrats !!!!!

    ReplyDelete

The dilemma

My mother-in-law left for Pune today after spending two and a half months with us in Germany. And suddenly the house seems empty without her...