This is my world of penning down thoughts which keep fleeting in my mind. I realized that writing a few lines about topics that touch me or move me give me so much joy and help me release my frustration and stress if any. I have tried to address issues which are near to my heart. You all are welcome to share your thoughts on the topics and also suggest new topics to me for writing, which may be close to your heart!
01 November 2020
The new me
18 September 2020
मी आणि माझा मित्रपक्ष - मांजर
आज सकाळी सकाळी आईचा व्हाट्सअँप वर मेसेज, वेळ झाला की कॉल कर, एक गम्मत सांगायची आहे.
आज काय झालं - मी मनातल्या मनात
पटकन कामं आवरली आणि तिला फोन केला.
आई: अगं तुला ती मनी माऊ आठवत्ये ना, रोज आपल्या बाल्कनी मध्ये येणारी?
मी: हं
आई: ती अगं बाळंतीण झाली होती, पण तिची पिल्लं कुठे ठेवली होतीं इतके दिवस हे काही कळत नव्हतं. परवा बाबा आणि मी बाल्कनी मध्ये उभे होतो रस्त्यावरची गम्मत बघत तर खाली बघतो तर काय, एक पिल्लू निपचित पडलं होतं, आपल्या बाल्कनी च्या खाली, त्या दुकानाच्या वरच्या पॅसेज मध्ये. काही हालचाल करत नव्हतं. आम्हाला वाटलं मेल बिचारं. पाऊस खूप पडत होता. नंतर त्याला वर काढू असा विचार करून आम्ही घरात गेलो. २४ तास उलटून गेले, तरी पाऊस थांबायचा काही पत्ता नाही. ते पिलू तसंच तिकडे होते आणि काय चमत्कार, ते हालत होते अगं. बाबा तर एकदम ओरडले, ते हलतंय, ते हलतंय. त्यांच्या ऑफिस मध्ये एक बाई कामाला आहे झाड पूस करणारी ती सांगायची मांजरीचे पिल्लू मला द्या ती व्यायली की. त्यांनी तडक तिला फोन केला, ती धावतच आली, तिच्या नातीला ही घेऊन आली. भर पावसात बाबा खाली उतरले आणि त्यांनी त्या पिल्लाला उचलले, त्या बाईंनी मग बाबाना वर चढायला मदत केली. मी डब्बा शोधून घेऊन येई पर्यंत ह्यांनी पिल्लाला वर काढलं ही. मी ओरडलेच बाबांना. पडले बिडले असते म्हणजे, एवढ्या पावसात, केवढ्याला पडलं असतं ते. असो. महत्वाचं म्हणजे ते पिल्लू जिवंत होतं. त्या पिल्लाला पुसलं, त्याला कापड घालून डब्यात बसवलं, त्याला बोळ्याने दूध पाजलं आणि ते पिल्लू ती बाई घेऊन गेली घरी. आता ते मस्त आहे. वाढतं आहे, तिची नातं त्या पिल्लाची मस्त काळजी घेत आहे! बघ ज्याच्या पाठी देव असतो, त्याला कोणी काहीही करू शकत नाही. २४ तास पावसात भिजत होते ते. आजूबाजूला कावळे, कबूतंर होती, पण ते टिकून राहिलं, त्याचे स्वाश चालू होते, त्याची दोरी बळकट होती!
मी: काय सांगतेस काय? खूपच मस्त बातमी आहे की ते पिल्लू आता बरं आहे! आणि बाकीच्या पिल्लांचं काही कळलं का?
आई: हो, अगं तिसऱ्या मजल्यावर श्रेया च्या घरासमोर आहे सगळी फॅमिली. ३ पिल्लं आणि स्वतः आई. तिसऱ्या मजल्यावर सगळ्यांकडे जाते, दूध पिते, म्हणून आपल्याकडे आता कमी येते. एकदा सकाळी हजेरी लावून जाते. बाबांशी मस्ती करून, त्यांच्या पायात घुटमळून. त्यांनी कुरवाळले, दूध दिले की ही पसार. वर तिसऱ्या मजल्यावर सगळे छान काळजी घेत आहेत तिची.
मी: चला बरं झालं. तुमची काळजी मिटली. तुम्हाला ही तुमची नातवंडं बघता येतील वरचेवर.
आई हसली.
आई: हो गं, आम्हांला ही थोडा विरंगुळा. वेळ कसा जायचा नाहीतर आमचा? तेवढंच जरा तोंडीलावणं.
मी: हो, खरंय!
मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारून, एकमेकींना बाय करून, फोन ठेवला.
तसं मांजर हा विषय आमचा खूप जिव्हाळ्याचा. शाळेत असताना आमच्याकडे नेहमीच मांजर असायचे. आमचे घर पहिल्या मजल्यावर असल्याने आणि मोट्ठी टेरेस असल्याने मांजरी सहज तिकडे येऊ शकायच्या आणि आम्ही ही कधी त्यांना हाकलून दिलं नाही. माझे आजी आजोबा नेहमीच मला प्रोत्साहन देत आणि मांजरीचं करायला मदत करत. आमच्याकडे जवळ जवळ १५ वर्ष मांजरीच्या तीन पिढ्या वाढल्या. मग प्रत्येक मांजरीची डझन भर बाळंतपणं, त्या पिलांचे बोक्यांपासून संरक्षण करणं, पिल्लं थोडी मोट्ठी झाली कि त्यांना कोणाला तरी देणं किंवा मग दूर सोडून येणं हे काम माझे आणि माझ्या बाबांचे असायचे. वेलणकर कॅट मॅटर्निटी होम असं नाव ठेवायला पाहिजे असं मी बाबाना नेहमी गमतीने म्हणायचे.
माझी आजी तासंतास मांजरीशी गप्पा मारत बसायची. बाहेर जिन्यावरून जाणारे लोक अचंबित होयचे. घरात कोणी नसताना आजी कोणाशी बोलत आहेत असा नेहमीच त्यांना प्रश्न पडायचा. मांजर सुद्धा डोळे मिटून शांतपणे आजीचं सगळं ऐकत बसायची. पायात घुटमळत राहणे हा त्यांचा मनपसंद छंद. कधी कधी तर आजीच्या नऊवारी पाताळामध्ये अडकून आजी पडता पडता वाचायची, मग खायची आजीच्या शिव्या. पण तरीही दुसऱ्या मिंटाला परत तेच. मांजर आम्हांला सगळ्यांना अजिबात घाबरायची नाही. पण माझी आई ऑफिस मधून येणार हे कळलं, म्हणजे जवळ पास ६ वाजले कि ही बरोबर सोफ्यावरून खाली उतरून तिच्या नेमून दिलेल्या जागेवर येऊन बसायची. आईचा दराराच असा होता कि मांजर ही घाबरून असायचे.
आमच्याकडे असलेली मांजर कधीच चोरून दूध प्यायची नाही. मांजर ह्या नावाला ती कधीच जागली नाही. तिच्या ताटली मध्ये दूध दिलं तरच ती प्यायची, कधी चुकून दूध उतू गेलं आणि हिला ओट्यावर आम्ही नेऊन तोंड दुधापाशी नेलं तरीही ही अजिबात प्यायची नाही. ते उतू गेलेलं दूध मग आजी तिच्या ताटलीमध्ये ओतायची तेव्हा मॅडम पिणार. दुधाचा पातेलं साफ करायची वेळ ठरलेली असायची, रात्री ८ ला आई राहिलेली साय काढून, थोडा खरवडून मांजरीला दूध द्यायची. ८ वाजले रे वाजले कि ही कुठूनतरी धावत यायची आणि सगळं गट्टम करून टाकायची. तिच्या डोक्यात वेळ अगदी फिट्ट बसली होती. तिन्ही पिढ्या अगदी ना चुकता वेळेत येऊन दूध प्यायच्या.
माझ्या शाळेतल्या मैत्रिणी नेहमी यायच्या पिलांशी खेळायला किंवा मनीमाऊ चे खेळ पाहायला. तासंतास स्वतःला स्वचछ करत चाटत बसायची. उन्हं खात, मस्त रेलून द्यायची. कधी स्वतःच्या शेपटीशी गोल गोल फिरत खेळत बसायची. तिच्याकडे कधी छोटा रबरी बॉल टाकला कि मस्त दोन्ही पुढच्या पायांनी इकडून तिकडे सरकावायची. एकदा चुकून लोकरीचा गोळा आला तिच्या ताब्यात, मग काय विचारता, मस्त स्वतःला त्याच्यात गुंडाळून घेऊन अडकली कि. तिला सोडवायला किती तरी वेळ लागला. माझे आजोबा गेले त्या नंतर ३ दिवस तिने काहीही खाल्लं नाही. सारखी ते असलेल्या खोलीत जायची, त्यांना हाक मारल्यासारखं म्याव म्याव करत त्यांना शोधत होती.
एकदा ती समोरच्या तिसऱ्या मजल्यावरच्या एका घरच्या खिडकीच्या छपरावर अडकली. तिथे कशी काय गेली कोणास ठाऊक. ते घर बंद होतं, अनेक वर्ष. तिथे कोणीच रहात नव्हतं. काढणार तरी कसं तिला. बरं इकडून बोलून काही तिला कळणार नव्हतं. फायर ब्रिगेड ला बोलवायचा विचार झाला. शेवटी मग आमच्याकडे पाण्याचा पंप चालू करणारा एक नेपाळी माणूस शिडी घेऊन तिथपर्यंत चढला आणि त्याने तिला खेचून खाली काढले. बापरे! इतका जीव खाली वर सगळ्यांचा! काही विचारू नका. इतकी लोक जमा झाली होती आजूबाजूला, रस्त्यावर! वेलणकरांची मांजर चांगलीच फेमस झाली होती. नंतर एकदा कधीतरी ती जवळ जवळ १ आठवडा गायब होती. आम्ही तिला खूप शोधलं, आजू बाजूला सांगून ठेवलं. सगळे ओळखत होतेच आमच्या कबरीला. मस्त काळी पांढरी मऊ केस आणि हिरवे डोळे असलेले आमची कबरी! ती काही केल्या सापडेना. मी तर खूप निराश झाले. लक्ष लागत नव्हतं कशातच. एकदा खेळत असताना शेजारच्या बिल्डिंग मध्ये कुठून तरी तिचा आवाज आला. मी तिला हाक मारली. तर बिचारी ती धावत पळत, गळ्यात दोरी बांधलेली, माझ्यावर उडीच मारली तिने. मी तिला पटकन कुशीत घेतले. ती शांत झाली. धाप लागली होती तिला. कितीतरी दिवस उपाशी होती कि काय कोणास ठाऊक, रोड झाली होती. मी तिला घरी नेलं, घरी सगळे तिला बघून खुश. तिला दूध दिलं आणि मग ती झोपली. मग बरेच दिवस ती बाहेर जायला घाबरायची. मग नंतर जाऊ लागली. ती असताना कधीही उंदीर, झुरळ किंवा इतर काहीही घराकडे फिरकले नाही.
ती आमच्या घरातला एक घटक होती, आमच्या कुटुंबाचा एक भाग. मग काही वर्षांनी बिल्डिंग च्या दुरुस्तीचं काम निघालं. तेव्हा कोणीतरी तिला परत उचलून नेलं आणि मग ती काही परत आली नाही. तेव्हा पासून मी ठरवलं परत मांजर पाळायची नाही. नंतर मी ही अभ्यासात बिझी झाले आणि मांजर हा विषय माझ्यासाठी संपला.
मला मांजरीची भीती वाटत नाही, किंवा काहींना वाटतो तसं तिरस्कार ही वाटत नाही. मी मांजरींना खूप जवळून पाहिलं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबाद्ल नेहमीच आपुलकी वाटते. बंगलोर ला ही यायची एक बाल्कनी मध्ये. तिला ही दूध द्यायचो मी आणि तनय. नंतर मग आम्ही जर्मनी ला आलो, इकडे काही शक्य नाही मांजर पाळणं. बरेच सोपस्कार आहेत इकडे, इन्शुरन्स वैगैरे करावा लागतो.
डोंबिवली ला परत आता एक मांजर येऊ लागलं आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं. आई बाबा अगदी मनापासून तिचं करतात. तिच्यावर लक्ष ठेऊन असतात. तिची काळजी करतात, वेळेत नाही आली तर! जुन्या त्या सगळल्या आठवणी परत डोळ्यासमोरून गेल्या. त्यांच्या मुळे मला भावंडं नाहीत ह्याचा मला कधीच वाईट वाटलं नाही. त्यांची मोट्ठी बहीण म्हणूनच मी त्यांची काळजी घेतली आणि त्यांना लळा लावला. त्या सगळ्या मांजरींना माझा धन्यवाद. तुमच्यामुळे ही भूतदया शिकले आणि माझा बालपण समृद्ध झालं!
31 August 2020
Uncomplicated!
After the lockdown worldwide owing to the Corona pandemic, everyone is trying to cope up with the new way of life. Kids couldn't go out to play, adults couldn't go to their workplace daily, going out on vacation became a distant dream, leave alone going shopping groceries became difficult. In Germany, it was comparatively better than anywhere else in the world, and the kids here could play with each other in the open areas after the infection curve came down. My son has a lot of friends, mostly from his school, and he spent time playing with them and talking to them about the online games on Playstation 4 like Minecraft and things which I do not understand at all!
Being at home gave me a chance to observe my son very closely during these 4 months. He is growing up by leap and bounds in the way he talks, thinks, and acts. How are boys wired to think and feel? This topic always intrigues me! Relationships, friendships, my family has always been very dear to me. But I see a very different response to all these things from my son. He is just 8, but it is interesting to listen to him talk many times. My detailed questions are usually responded with one word! Then I have to dig down deep and ask another set of questions to which he may or might not choose to answer!
He had a very close friend called Nick in the new school that he joined in January this year. They almost hung out every day after school, too, after quickly finishing the homework. T went to his house to play every day at 3 pm. They played till 6 pm and then came over to our house. Till 7, they played at our house, and many times, Nick had dinner at our home, sometimes bread, sometimes some Indian stuff. They almost seemed inseparable. They went to school together and came back together. I was reminded of "Jai and Veeru" from Sholay! But during the lockdown, something changed, and they saw less and less of each other. I asked T the reason, and he just plainly replied he has other friends to play with and doesn't want to play with Nick. I think they had a fight and didn't resolve the matter then and there. The issue got carried on for many days, and till the time I called Nick's mom (who is also my friend over tea at home, they didn't see each other's faces! Tanay didn't miss him at all!? Nick didn't miss Tanay either! That's the way usually kids function, I think. When they met again after a long gap, they played and talked with each other as if nothing had happened between them. Now they play with common friends together, but not like earlier, where they both were inseparable.
I wondered, would it be so simple with girls? Their dynamics, their emotions are completely different. There is jealousy if a best friend plays with someone else or if a girl doesn't get the necessary attention from her best friend. But with boys, either it is subtle, and they don't show it, or it doesn't register in their heads at all that! They are happy with anyone who plays with them, need not be a close or best friend, I guess. Recently, T made friends with one boy who was on a visit to his grandmother for summer vacations. He stayed here earlier but later shifted to his parents. So the other boys from T's school knew him, and he also became a good friend of T. All the boys regularly went to the friend's place to swim as there was a big swimming pool inside the house. The grandmother was gracious enough to welcome a bunch of boys every single day. When it was time for that friend to leave and go back to his parents, I suggested Tanay give me a small little thing as a "Thank You" because he let him in his life and in his home. But this boy was not convinced. No one else was thanking that friend, why should I, was his question. We had a tough time making him understand, and with great difficulty, he became ready to give him a packet of chips and a bar of chocolate! They lovingly said goodbye to each other, and that's it. No more mention of him again after he left!
I sometimes feel it's good that T doesn't get emotionally involved with people and situations. He can move on in life quickly and adjust to new circumstances very easily. But on the other side, I feel that the emotional connection is very essential to be humane, to feel, to love, to hate, to express. If there are no emotions, life would be so dry for him as an adult. But as I said, boys are equipped with a different set of genes altogether, and their response to things and situations is going to be very different from how girls would respond. But one thing I realized that boys are uncomplicated. It's either this or that for them, either black or white, no third side or thought.
I can't expect the same warmth and love I have for my friends and family from him as well. He is a different person, an individual with his own mind. I need to learn to accept it and adjust to it! It's a learning process for me as well!

25 July 2020
A fan's tribute to SSR
Your last movie!? Really?
I am still in two minds! I am not sure if I should watch the movie, which I know for sure is an emotional ride and a tear-jerker! I cried the last time when I watched you die in "Kai Po Che." I knew you aren't around in person anymore, then why did I cry watching you die in that movie? The movie Kedarnath has the same ending where you die, and I am sure the film that released yesterday would also be having the same end, of you, dying with a big smile on your face. The songs of your last movie are the right tribute to you, I feel. A. R. Rahman is a magician who has done full justice to the album, and I can't stop listening to the music in a loop and imagining your smiling face in all those numbers!
Like millions of your fans, I am not still able to come to terms with your departure, your sudden departure from this world. You had so much potential, so much love, so much talent. You had the humility and a thirst for learning new things. You had so many plans to make this world a better place, do something big in the craft that you really loved to the core, and wanted to be the best in whatever you did!
After your death, people have gone crazy. Your fans are not able to accept that you committed suicide. Many smell a foul play in your departure, and they want a thorough investigation of your death. Many people have resorted to making videos of your life, your friends, your enemies, your movies, etc. People are talking to each other about your goodness, your charm, your dedication towards life, and personal growth. A few fans are contacting people (dealing with paranormal things) and asking to have sessions with your departed soul!? They want an answer, just like I do. They want to know the reason behind your exit. An exit that no one had imagined when they met you in person or watched your movies in theatres. Many questions are surrounding your death, and no one really knows if there would be any answers available to them. We all know that nothing is going to bring you back. That smile is never going to return. That twinkle in your eyes is never going to be there again. We are never going to watch you in movies, exploring different themes, and achieving unparalleled success. We should now accept that you had only those many breaths on this earth and that much time to give your fans and your loved ones.
I think you have become more popular after your death, which is actually an unfortunate thing. No one really talked to you or wanted to know how you were doing when you were alive. You had no friends, no real friends to fall back on. You were the lone star who was standing strong amidst dark clouds and dark nights. And now you have become a star yourself. How does it feel to look down? How does it feel to see a war raged after your death?
I pray for your peace. I pray for your soul to achieve the next stage for which it left the earth. I thank you for making our lives bright by your movies and your acts. I thank you for taking the risk to swim against the tide.
I hope the truth will be out, sooner or later.
I hope you will get justice.
I hope we all will get justice.
Dedicating this song to you, dear Sushant.
Tum Na hue mere to kya
Your admirer and your fan
XYZ
21 June 2020
A wake-up call
14 June 2020
Suicide is the not an answer to Depression!
10 June 2020
वाचन रंजन - एक नवीन प्रयत्न
https://www.lifehack.org/articles/lifestyle/10-benefits-reading-why-you-should-read-everyday.html
तुम्ही म्हणाल बघा परत वाचायला सांगत्ये, त्याचाच तर कंटाळा आहे ना, त्यावर काय उपाय? गोष्टी तर आवडतात आम्हाला पण आम्हाला कोण सांगणार आता गोष्टी? लहान नाही राहिलो आम्ही काही! लहान मुलांनाच फक्त गोष्टी आवडतात असं कोण म्हणतं? मोट्ठ्यांना ही आवडतात गोष्टी, पण असं काय उपलब्ध आहे मोठ्यांसाठी? जिथे गोष्टी ऐकता येतील? कुठेही कधीही?
ह्याच्यातून जन्म झाला वाचन रंजन चा. वाचन रंजन मध्ये मी आणि काही मैत्रिणीनी मिळून अभिवाचन करायचं ठरवलं. मला खरं तर सुद्धा मूर्ती, रस्किन बॉण्ड ह्यांच्या गोष्टी वाचायच्या होत्या. पण जरा संशोधन केल्यानंतर कळलं की ते खूपच कठीण आहे आणि त्रासदायक सुद्धा! प्रत्येक लेखकाची परवानगी घेतली पाहिजे आणि प्रकाशकांची सुद्धा! एवढा वेळ नव्हता आणि एवढा खटाटोप करून त्यांची परवानगी मिळेलच ह्याची काही शाश्वती नव्हती. मग माझ्या डोक्यात आणखीन एक कल्पना आली. नवीन, होतकरू, परिचयाचे लेखक आहेतच की ज्यांना त्यांच्या गोष्टी इतरांपर्यंत पोचलेल्या आवडतील. असे लेखक जे अगदी सुद्धा मूर्ती किंवा रस्किन बॉण्ड सारखे नसतील, पण त्यांच्यात ही प्रतिभा असेल, एक गोष्ट सांगायची कळकळ असेल! आम्ही आमच्या अश्या काही मित्र, मैत्रिनींना पाचारण केले आणि त्यांना ही कल्पना फारच आवडली. त्यांनी पटापट त्यांच्या गोष्टी आम्हाला पाठवल्या. मग आम्ही गोष्टींची, लेखांची एक यादी बनवली आणि आता आमच्याकडे जवळ जवळ एक वर्ष पुरतील एवढा गोष्टींचा खजिना आहे! आम्ही तर शुक्रवारी एक गोष्ट प्रकाशित करतो, आता पर्यंत आम्ही दोन गोष्टी प्रकाशित केल्या आहेत. आमच्या टीम मधल्या दोन जणी, अनघा महाजन आणि पद्मा दाबके ह्यांनी त्या दोन गोष्टींचे अभिवाचन केले आहे. महिन्याला पाच गोष्टी तरी प्रकाशित करू असा आमचा निर्धार आहे.
वाचन रंजन ला भरगोस प्रतिसाद मिळेल अशी आमची अशा आहे. इतरांना आनंद मिळावा आणि नवीन लेखकांना ओळख आणि प्रोत्साहन मिळावं हाच आमचा हेतू आहे ह्यामागे. गोष्टींवर असलेले आमचे प्रेम हे इतरांपर्यंत पोचावे हाच आमचा प्रयत्न. लहान, मोठे, तरुण, म्हातारे सगळ्यांसाठीच असणार आहेत गोष्टी.
तुम्ही ही आजच ह्या चॅनेल चे सभासद व्हा, गोष्टी ऐका, आनंद घ्या, आनंद दुसऱ्यांना ही वाटा, स्वस्थ रहा, मस्त घरबसल्या गोष्टी ऐका!
चॅनेल ची लिंक इथे देत आहे
https://www.youtube.com/channel/UCdxlKDWnowjFG5p8pc3cHtg
Use it or lose it
Today, on the 9th of June is my paternal grandfather's death anniversary. Even after so many years of him not being around, I still reme...
-
नादातुनी या नाद निर्मितो - 2 ।। श्रीराम जय राम जय जय राम ।। नाद निर्मितो मंगलधाम ।। श्रीराम जय राम जय जय राम ।। परब्रह्...
-
Today, on the 9th of June is my paternal grandfather's death anniversary. Even after so many years of him not being around, I still reme...
-
Usually the months of August and September are devoted to the festivities involving Lord Ganesha in most parts of India. Ganesha, Ganpati, B...


