10 June 2020

वाचन रंजन - एक नवीन प्रयत्न

मला लहानपणापासूनच गोष्टी ऐकायला आणि सांगायला खूप आवडतात. कोणाला आवडत नाहीत? सगळ्यांनाच आवडतात! पुस्तक उघडून किंवा हल्ली किंडल उघडून पटकन कोणते ही पुस्तक वाचता येते. पुस्तकांच्या किमती हि हल्ली कमी झाल्या आहेत. डिजिटल पुस्तके हल्ली खूपच स्वस्त दरात उपलब्ध आहेत. सहा महिन्यांसाठी एक रक्कम भरून अमेझॉन वर किंडल अनलिमिटेड ह्या सदराखाली तुम्ही बरीच पुस्तक मोफत वाचू शकता. हा एवढा खटाटोप नको असेल तर ग्रंथालय हा दुसरा पर्याय. पण हल्ली वेळ असतो कोणाला तिकडे जाऊन, पुस्तक शोधून ती घरी आणून वाचायला? बरं ज्यांना वेळ असतो, त्यांना पुस्तक आवडतंच असं नाही. कंटाळा येतो बऱ्याच जणांना वाचायला बसलं की. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे वाचन केल्याचे काय काय फायदे आहेत. ते मी इथे परत नमूद करते:

https://www.lifehack.org/articles/lifestyle/10-benefits-reading-why-you-should-read-everyday.html

तुम्ही म्हणाल बघा परत वाचायला सांगत्ये, त्याचाच तर कंटाळा आहे ना, त्यावर काय उपाय? गोष्टी तर आवडतात आम्हाला पण आम्हाला कोण सांगणार आता गोष्टी? लहान नाही राहिलो आम्ही काही! लहान मुलांनाच फक्त गोष्टी आवडतात असं कोण म्हणतं? मोट्ठ्यांना ही आवडतात गोष्टी, पण असं काय उपलब्ध आहे मोठ्यांसाठी? जिथे गोष्टी ऐकता येतील? कुठेही कधीही?

ह्याच्यातून जन्म झाला वाचन रंजन चा. वाचन रंजन मध्ये मी आणि काही मैत्रिणीनी मिळून अभिवाचन करायचं ठरवलं. मला खरं तर सुद्धा मूर्ती, रस्किन बॉण्ड ह्यांच्या गोष्टी वाचायच्या होत्या. पण जरा संशोधन केल्यानंतर कळलं की ते खूपच कठीण आहे आणि त्रासदायक सुद्धा! प्रत्येक लेखकाची परवानगी घेतली पाहिजे आणि प्रकाशकांची सुद्धा! एवढा वेळ नव्हता आणि एवढा खटाटोप करून त्यांची परवानगी मिळेलच ह्याची काही शाश्वती नव्हती. मग माझ्या डोक्यात आणखीन एक कल्पना आली. नवीन, होतकरू, परिचयाचे लेखक आहेतच की ज्यांना त्यांच्या गोष्टी इतरांपर्यंत पोचलेल्या आवडतील. असे लेखक जे अगदी सुद्धा मूर्ती किंवा रस्किन बॉण्ड सारखे नसतील, पण त्यांच्यात ही प्रतिभा असेल, एक गोष्ट सांगायची कळकळ असेल! आम्ही आमच्या अश्या काही मित्र, मैत्रिनींना पाचारण केले आणि त्यांना ही कल्पना फारच आवडली. त्यांनी पटापट त्यांच्या गोष्टी आम्हाला पाठवल्या. मग आम्ही गोष्टींची, लेखांची एक यादी बनवली आणि आता आमच्याकडे जवळ जवळ एक वर्ष पुरतील एवढा गोष्टींचा खजिना आहे! आम्ही तर शुक्रवारी एक गोष्ट प्रकाशित करतो, आता पर्यंत आम्ही दोन गोष्टी प्रकाशित केल्या आहेत. आमच्या टीम मधल्या दोन जणी, अनघा महाजन आणि पद्मा दाबके ह्यांनी त्या दोन गोष्टींचे अभिवाचन केले आहे. महिन्याला पाच गोष्टी तरी प्रकाशित करू असा आमचा निर्धार आहे.


वाचन रंजन ला भरगोस प्रतिसाद मिळेल अशी आमची अशा आहे.  इतरांना आनंद मिळावा आणि नवीन लेखकांना ओळख आणि प्रोत्साहन मिळावं हाच आमचा हेतू आहे ह्यामागे. गोष्टींवर असलेले आमचे प्रेम हे इतरांपर्यंत पोचावे हाच आमचा प्रयत्न. लहान, मोठे, तरुण, म्हातारे सगळ्यांसाठीच असणार आहेत गोष्टी.

तुम्ही ही आजच ह्या चॅनेल चे सभासद व्हा, गोष्टी ऐका, आनंद घ्या, आनंद दुसऱ्यांना ही वाटा, स्वस्थ रहा, मस्त घरबसल्या गोष्टी ऐका!

चॅनेल ची लिंक इथे देत आहे

https://www.youtube.com/channel/UCdxlKDWnowjFG5p8pc3cHtg


No comments:

Post a Comment

The dilemma

My mother-in-law left for Pune today after spending two and a half months with us in Germany. And suddenly the house seems empty without her...