Showing posts with label Parenthood. Show all posts
Showing posts with label Parenthood. Show all posts

05 November 2026

ती

ती हल्ली जास्तच थकलेली वाटते,
आयुष्यातली वादळं झेलता झेलता,
आता थोडीशी वाकलेली वाटते.
तिच्या हालचाली आता एकदम हळूहळू सुरू असतात,
बरेचदा त्याच त्याच गोष्टी तिच्याकडून नव्याने ऐकाव्या लागतात.
देवाचं नाव घेत आता तिचा बराच वेळ जातो,
तिच्यात आता मला माझ्या आजीचाच भास होतो.
पहिल्यासारखी घाई गडबड आता तिला झेपत नाही,
नवीन काही गोष्टी करायला ती आता धजत नाही.
आत्मविश्वास असलेली जी आई मला माहीत होती,
ती आता कुठेतरी हरवली आहे,
एक वेगळीच बाई तिच्यात घर करून बसली आहे.
वर्षं सरत जातात, धकाधकीच्या आयुष्यात सगळेच गुंतून पडतात.
सगळं जग जरी बदललं तरी 
आपली आई आता म्हातारी झाली आहे,
हे काही मनाला पटत नाही,
हे काही मनाला पटत नाही.


ती

ती हल्ली जास्तच थकलेली वाटते, आयुष्यातली वादळं झेलता झेलता, आता थोडीशी वाकलेली वाटते. तिच्या हालचाली आता एकदम हळूहळू सुरू असतात,...