दिवाळी २०२०
२०२० हे वर्ष खूपच वेगळं आहे. सगळ्यांच्या लक्षात रहाण्याजोगं आहे. कोरोना ह्या छोट्याश्या विषाणू ने काय काय गमती घडवून आणल्या जगभरात हे काही आपल्याला आता नवीन नाही. लोकांच्या राहायच्या सवयी बदल्या, कामाच्या वेळा आणि स्वरूप बदलले, मित्र परिवार, नातेवाईक ह्यांना प्रत्यक्ष न भेटता ऑनलाईन सुद्धा भेटता येते, हे उमगले. ११ महिने हां हां म्हणता गेले सुद्धा आणि दिवाळी येऊन ठेपली. जर्मनी मध्ये काय ती दिवाळी! मागच्या वर्षी मराठी मंडळ कार्लसहृ चा मस्त "दिवाळी फराळ" हा कार्यक्रम तरी झाला होता एक दिवसाचा, पण ह्या वर्षी जानेवारी मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम सोडला तर काहीही करता आलं नाही. मग सगळ्यांनी घरच्या घरीच दिवाळी साजरी केली ह्या वर्षी. आमची ह्या वर्षी चंगळ होती. माझ्या आई बाबानी आणि सासू सासर्यांनी भरपूर खाऊ, फराळ आम्हाला इकडे पाठवला. ते नाही येऊ शकले, पण त्यांचे आशीर्वाद, प्रेम आणि खाऊ मात्र धनत्रयोदशी ला येऊन पोचला. मग काय माझी मज्जा! लहान मुलासारखं झालं होतें मला. एक एक बॉक्स मधून खाऊ आणि इतर सामान काढताना इतकी गम्मत वाटत होती! मी घरी लाडू आणि चिवडा केला होता, बाकी सगळं तिकडून आलं. चकल...