Posts

Showing posts from September, 2020

मी आणि माझा मित्रपक्ष - मांजर

Image
आज सकाळी सकाळी आईचा व्हाट्सअँप वर मेसेज, वेळ झाला की कॉल कर, एक गम्मत सांगायची आहे.  आज काय झालं - मी मनातल्या मनात  पटकन कामं आवरली आणि तिला फोन केला. आई: अगं तुला ती मनी माऊ आठवत्ये ना, रोज आपल्या बाल्कनी मध्ये येणारी?  मी: हं आई: ती अगं बाळंतीण झाली होती, पण तिची पिल्लं कुठे ठेवली होतीं इतके दिवस हे काही कळत नव्हतं. परवा बाबा आणि मी बाल्कनी मध्ये उभे होतो रस्त्यावरची गम्मत बघत तर खाली बघतो तर काय, एक पिल्लू निपचित पडलं होतं, आपल्या बाल्कनी च्या खाली, त्या दुकानाच्या वरच्या पॅसेज मध्ये. काही हालचाल करत नव्हतं. आम्हाला वाटलं मेल बिचारं. पाऊस खूप पडत होता. नंतर त्याला वर काढू असा विचार करून आम्ही घरात गेलो. २४ तास उलटून गेले, तरी पाऊस थांबायचा काही पत्ता नाही. ते पिलू तसंच तिकडे होते आणि काय चमत्कार, ते हालत होते अगं. बाबा तर एकदम ओरडले, ते हलतंय, ते हलतंय. त्यांच्या ऑफिस मध्ये एक बाई कामाला आहे झाड पूस करणारी ती सांगायची मांजरीचे पिल्लू मला द्या ती व्यायली की. त्यांनी तडक तिला फोन केला, ती धावतच आली, तिच्या नातीला ही घेऊन आली. भर पावसात बाबा खाली उतरले आणि त्यांनी त्या प...