चाहूल तुझी
लागता
मी मोहरून गेले
तुझा आगमन
लवकरच होणार
ह्याने मी अत्यंत
भारावून गेले..
तू कोणासारखा दिसशील?
असा हसशील की तशी रडशील?
तुझे केस कसे असतील?
टपोरे घारे डोळे
की बाबासारखे मधाळ?
पण मुख्य म्हणजे तू कसा ही असलास आणि दिसलास तरी
आमचा असशील!
छकुले /छकुल्या ..
तुझी वाट बघत
तुझी स्वप्न रंगवत
रोज तुझ्याशी बोलत
तुला गोष्ट सांगण्यात
आता दिवस भुर्कन उडून जातील...
आणि मग
तुला हातात घेईन तेव्हा
मला काय वाटेल
तू मला आई केलस
ह्या भावनेने तर मला रडूच येईल
मला काय वाटेल
तू मला आई केलस
ह्या भावनेने तर मला रडूच येईल
मग सुरु होईल एक सुंदर प्रवास
तुला वाढवण्याचा आणि
तुझ्याबरोबर मला ही भरपूर काही शिकायचा
Beautifully written dear :-) Too good !!!
ReplyDeleteDidn't get the meaning of most of the words but am sure it's a beautiful poem.
ReplyDeleteIn bet, the blog theme looks nice :-)
kay masta lihile ahe ga... pharach sundar ..
ReplyDeleteKaviyatri zalis ki ..
Congrats !!!!!